दावोस (स्वित्झर्लंड)   India Pavilion  आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचे ललित गांधी यांना आसाम भेटीसाठी विशेष निमंत्रण

आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचे ललित गांधी यांना आसाम भेटीसाठी विशेष निमंत्रण
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने दावोस येथे उपस्थित असलेले आसामचे माननीय मुख्यमंत्री श्री. हेमंत विश्व शर्मा यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांचे शिष्टमंडळ घेऊन आसाम राज्याला भेट देण्याचे विशेष निमंत्रण श्री. ललित गांधी यांना दिले.
दावोस येथील इंडिया पवेलियनमध्ये आसाम सरकारच्या कक्षात श्री. ललित गांधी यांनी मुख्यमंत्री श्री. हेमंत विश्व शर्मा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र–आसाम दरम्यान औद्योगिक व व्यापारी सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने ललित गांधी यांना औपचारिक आमंत्रण दिले.
या चर्चेदरम्यान महाराष्ट्र सरकारने जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या *“जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळा”*च्या रचना, उद्दिष्टे व कार्यपद्धतीबाबतही मुख्यमंत्री श्री. हेमंत विश्व शर्मा यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.