दावोस, स्वित्झर्लंड | महाराष्ट्र पॅव्हेलियन  गुंतवणूक करारावर स्वाक्षरी

माझे सहकारी व मित्र श्री. अमरीश पिपाडा यांनी त्यांच्या मेघाटेक ग्लोबल टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीच्या वतीने महाराष्ट्रात सर्व्हर निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ₹१,००० कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनासोबत केला.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार संपन्न झाला. यावेळी उद्योग खात्याचे सचिव श्री. पी. अनबलगन, उद्योग आयुक्त श्री. दीपेंद्र कुशवाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वेलारासू, श्री. अंकुर सुराणा, श्री. श्रीपाल पिपाडा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डेटा सेंटर्स व संगणक क्षेत्रातील विविध गरजांसाठी अत्याधुनिक सर्व्हर निर्मिती करणारा हा देशातील दुसरा प्रकल्प असून, महाराष्ट्राच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल.