दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियनचे भव्य उद्घाटन
दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियनचे भव्य उद्घाटन
दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचे औद्योगिक सामर्थ्य, गुंतवणुकीच्या संधी आणि विकासाभिमुख धोरणे प्रभावीपणे मांडण्यात आली.
या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. यावेळी महाराष्ट्राचे धडाडीचे व दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना राज्यासाठी साध्य झालेल्या नव्या गुंतवणूक विक्रमाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत औद्योगिक विकासात नवे मैलाचे दगड गाठले आहेत, असे यावेळी नमूद करण्यात आले.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे उद्योग मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत, अर्थ राज्यमंत्री माननीय आशिषजी जयस्वाल, उद्योग विभागाचे सचिव श्री. पी. अनबलगन, उद्योग आयुक्त श्री. दिपेंद्र कुशवाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. वेलारासू, मुख्यमंत्री कार