दावोस येथे ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये महाराष्ट्राचा सहभाग; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र प्रदान
दावोस (स्वित्झर्लंड) | प्रतिनिधी
दावोस (स्वित्झर्लंड) येथे सुरू असलेल्या जागतिक औद्योगिक परिषदेदरम्यान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार श्री. उदय सामंत यांच्या समवेत ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला. या फोरमच्या माध्यमातून जागतिक उद्योगविश्वाशी महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेचा सखोल संवाद साधण्यात आला.
या प्रसंगी उद्योग मंत्री नामदार श्री. उदय सामंत यांच्या हस्ते फोरममधील उल्लेखनीय सहभागाबद्दल विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली तसेच भविष्यातील गुंतवणूक धोरणांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दावोस येथे होत असलेल्या या जागतिक परिषदेनिमित्त महाराष्ट्रातील केवळ प्रगत औद्योगिक जिल्ह्यांपुरतेच नव्हे, तर लहान व मागास जिल्ह्यांमध्येही नवीन उद्योग व गुंतवणूक आकर्षित व्हावी, अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यामुळे राज्यातील संतुलित औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.