पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे (चेअरमन – DICCI, IIM जम्मू, NIIT श्रीनगर) यांच्या समवेत दावोस येथील भारत पॅव्हिलियनला भेट देण्याचा मान मिळाला.

माझे परमस्नेही मित्र व मार्गदर्शक, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे
(चेअरमन – DICCI, IIM जम्मू, NIIT श्रीनगर) यांच्या समवेत दावोस येथील भारत पॅव्हिलियनला भेट देण्याचा मान मिळाला.
यावेळी भारत पॅव्हिलियनमधील महाराष्ट्राच्या दालनात भेट देऊन विविध आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांशी महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी व प्रस्तावांवर सखोल चर्चा करण्याची संधी मिळाली.
या प्रसंगी DICCI पश्चिम भारत विभागाचे प्रमुख माझे स्नेही श्री. संतोषजी कांबळे, श्री. सुगतजी वाघमारे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.